Nashik Crime  Saam Tv
Video

कॅप्टन अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध? अघोरी पूजेचा उल्लेख करत नेत्याचा गंभीर आरोप

Captain Ashok Kharat VSR company link investigation : कॅप्टन अशोक खरात प्रकरणात व्हीएसआर कंपनीशी संबंध आणि अघोरी पूजेच्या आरोपांमुळे नवा वाद पेटला आहे. एसआयटी तपासात नव्या धाग्यांचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Namdeo Kumbhar

aghori puja allegations Ajit Pawar residence controversy : कॅप्टन अशोक खरात यांचा व्हीएसआर कंपनीशी काय संबंध आहे?, याची चौकशी सरकारने करावी. अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील घराबाहेर झालेल्या आघोरी पूजेचे कनेक्शन कॅप्टन अशोक खरातसोबत आहे का ? : आमदार अमोल मिटकरी

अशोक खरातचा व्हीएसआर कंपनीशी काय संबंध आहे असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय..अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील घराबाहेर झालेल्या आघोरी पूजेचे कनेक्शन खरातसोबत आहे का याचाही तपास व्हायला हवा अशी मागणीही त्यांनी केली..

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात संदर्भात एक खळबजनक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये आमदार मिटकरी यांनी कॅप्टन खरात याचा 'व्हीएसआर कंपनी'च्या विमानासोबत एक फोटो ट्विट केलाय. कॅप्टन खरात याचे 'व्हीएसआर कंपनी'चा मालक व्ही. के. सिंग यांच्याशी काही संबंध आहे काय?, याचा तपास करण्याची मागणी केलीये. यासोबतच अजित पवारांच्या बारामती आणि मुंबई येथील निवासस्थानाबाहेर केलेल्या आघोरी पूजेशी कॅप्टन खरात याचा संबंध आहे का?, याचा तपास घेण्याची मागणी केलीयै. कॅप्टन खरातसंदर्भात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या 'एसआयटी'ने या दृष्टीनेही तपास करावा, अशी विनंती आमदार मिटकरी यांनी सरकारकडे केलीये. या तपासातून नक्कीच अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल महत्वाचे धागेद्वारे मिळतील, असा विश्वासही आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

SCROLL FOR NEXT