पुण्याच्या नारायण गावात अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. भाजपच्या माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आशा बुचके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त केला आहे. शिवाय शासकीय कामात डावलत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. तर अजित पवार यांनी पालकत्वाची भुमिका बजावली नाही असं आशा बुचके म्हणाल्या आहेत. आशा बुचके यांना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे अशा प्रकारची निदर्शनं करण्याची काहीच गरज नसल्याचं अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे म्हणाले आहेत. शिवाय अजित पवार गटाचे खासदार अमोल मिटकरी यांनी देखील या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.