Nitesh Rane News: राज्यात पुन्हा एकदा भाजप सकल हिंदू मोर्चा काढणारे. नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांवर भाजपच्या या सकल हिंदू मोर्च्याची जबाबदारी असणारे. "आम्ही हिंदुत्वासाठी नेहमी रस्त्यावर उतरणार आहोत. जिहादी लोकांची ताकद वाढली आहे त्यांना ठेचण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत" असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. त्याचबरोबर नितेश राणेंनी विरोधकांवरही हल्लाबोल केलाय. काल केंद्र सरकारने आपला अर्थंसंकल्प मांडला पण शाळेतील सर्वात ढ विद्यार्थी आपले ज्ञान देतो तेव्हा हसण्या पलीकडे काही होत नाही असा टोला राणेंनी लगावलाय. "तू आणि तुझ्या मालकाने बजेटवर बोलावं. तुझ्यात हिंमत असेल तर हे आव्हान स्वीकारावं. आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी एक पुस्तक लिहिलंय. वेळ काढून तू आणि तुझा मालक हे पुस्तक वाचा" असा सणसणीत टोला देखील नितेश राणेंनी संजय राऊतांनी लगावलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.