भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कुटुंबीयांशी संबंधित शाळेला शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.  saam tv
Video

भाजप आमदाराच्या शाळेला शिक्षण विभागाची नोटीस | BJP MLA Narendra Mehta school gets education department notice

BJP MLA Narendra Mehta school gets education department notice : भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबाशी संबंधित मीरा रोड येथील शाळेला अखेर ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Saam Tv

मनोज तांबे, भाईंदर | साम टीव्ही

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबाशी संबंधित मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेला शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखी कंदमुळे न आणण्याच्या सूचनेवरून वाद निर्माण झाला होता. आता दोन दिवसांत लेखी खुलासा देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

पर्यूषण पर्वात विद्यार्थ्यांना कांदा, लसूण, बटाटा, बीट यांचा समावेश असलेले पदार्थ टिफिनमध्ये आणण्यास मनाई असल्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाने दिल्या होत्या. त्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आल्याचे शाळेने म्हटले होते. मात्र, याबाबत आपला लेखी खुलासा दोन दिवसांत संबंधित कार्यालयास सादर करावा. खुलासा समाधानकारक असल्यास अथवा प्राप्त न झाल्यास तुमच्याविरुद्ध माध्यमिक शाळा संहिता, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ तसेच स्वयं-अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व नियमन) अधिनियम २०१२ अन्वये प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक नोद घ्यावी, असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT