BJP faces anger in Chhatrapati Sambhajinagar Saam TV
Video

VIDEO : तिकीट कापलं, राडा घातला, संतापानं बीपी वाढला; कुणी पेट्रोल आणलं...संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक

Chhatrapati Sambhaji Nagar Election : महापालिका निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुकांमध्ये संतापाचा उद्रेक झालेला दिसतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तिकीट कापल्यानं अनेक इच्छुकांनी कार्यालयासमोरच संताप व्यक्त केला. एका इच्छुक उमेदवारानं तर आत्मदहनासाठी बाटलीत पेट्रोल आणलं.

Nandkumar Joshi

राज्यात थंडीनं कहर केला असला तरी, निवडणुकांनी राजकीय माहोल प्रचंड तापलं आहे. बऱ्याच वर्षांनी महापालिकांच्या निवडणुका होत असल्यानं इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. तर काही ठिकाणी युती, आघाडी झाल्यानं त्या-त्या राजकीय पक्षांनी संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पण इतकी वर्षे तयारी करूनही तिकीट कापल्यानं इच्छुकांचा संयम सुटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात तर प्रचंड नाराजी आहे. संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर इच्छुकांनी तिकीट कापल्यानं संताप व्यक्त केला.

काही कार्यकर्त्यांनी तर आपल्या नेत्याला तिकीट नाकारल्यानं सावेंच्या केबिनचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. एका इच्छुक महिला उमेदवाराला तर संताप व्यक्त करताना भोवळ आली होती. शेवटी शेवटी तिला बोलताही येत नव्हतं. आम्ही निवडणुकीची तयारी केली होती. लाखो रुपये खर्च केले होते. आता यांनी तिकीट कापून आमचं आयुष्य बर्बाद केलं, असा गंभीर आरोप केला. आणखी एका इच्छुक महिला उमेदवारानं तर सोबत पेट्रोलनं भरलेली बाटली आणली होती. तिनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. एकूणच छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alcohol Fact: दारु प्यायल्यावर अनेकांना जुनी नाती का आठवतात? कारण वाचून व्हाल थक्क

Maharashtra Politics: पुण्यात भाजपला धक्का; चंद्रकांतदादांना नडलेला मोहरा राष्ट्रवादीला गावला, बड्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

तिकीट कापलं, ठाकरे सेनेविरोधात संताप; मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

Indigo आणि Air India मध्ये पायलटसाठी भरती; नुसता बोनसच ५० लाखांचा, तरीही तरीही वैमानिकांची ऑउटगोइंग सुरूच

SCROLL FOR NEXT