BJP News SaamTv
Video

BJP News : फडणवीसांचा वरचष्मा : भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Maharashtra Assembly Elections : भाजपकडून आज तिसऱ्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. यात 25 उमेदवारांचा समावेश असून यात फडणवीस यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचं बघायला मिळत आहे.

Saam Tv

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25 उमेदवारांची तिसरी यादी सोमवारी जाहीर केली. त्यात पक्षाने काँग्रेसचे बंडखोर नेते तथा विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांना देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर कारंजा येथून सई डहाके, सावनेर येथून आशिष देशमुख, मूर्तिजापूर येथून हरीश पिंपळे यांना मैदानात उतरवले आहे.

एकंदरीतच आधीच्या दोन्ही याद्या आणि ही यादी पहिली असता यात देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असल्याचं बघायला मिळत आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि इतर पक्षातून फडणवीस यांच्यामुळे भाजपमध्ये आलेल्यांना या याद्यांमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने 121 उमेदवार जाहीर केले आहेत. आजची 25 उमेदवारांची यादी मिळून भाजपकडून आतापर्यंत 146 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : दौंड तालुक्यात दोन एसटी बसचा अपघात; 40 हुन अधिक प्रवासी जखमी

Maharashtra Election: लोकसभेत तह विधानसभेत चेकमेट; पुरंदरमध्ये राष्ट्रवादीनेच वाढवलं महायुतीच्या विजय शिवतारेंचं टेन्शन

Maharashtra Election : मोठी बातमी! विधानसभेसाठी भाजपने मित्रपक्षांना सोडल्या ४ जागा, कुणाला केला पाठिंबा जाहीर?

40000 सूट, 165km रेंज; Hero च्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे जबरदस्त दिवाळी ऑफर

Maharashtra Election : 2 जागा, एक कॅबिनेट मंत्रिपद, ४ महामंडळ अध्यक्षपद; महायुतीकडून रामदास आठवलेंची नाराजी दूर?

SCROLL FOR NEXT