विशाळगड वासियांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबत कारवाई करण्यात येत होती, आता विशाळगडावरील कारवाई स्थगित करण्याचे निर्णय मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. भर पावसात कारवाई कशाला? असा प्रश्न उपस्थित करत कारवाई स्थगित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यावर आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान पावसाळा झाल्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमण दूर केलं पाहीजे, विशाळगडावरील लोकांचं पूनर्वसन सरकारने गडाच्या पायथ्याशी केलं पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.