PM Narendra Modi  saam tv
Video

Government Employees: सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशी दौऱ्यावर निर्बंध, वर्षभर प्रवास करता येणार नाही

Foreign Travel Restricted For Government Employees: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाने त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक परदेश प्रवासावर एक वर्षासाठी निर्बंध घातले आहेत.

Priya More

आखाती देशांमधील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशतील जनतेला इंधनाची बचत करा, परदेशात जाणं टाळा, वर्षभर सोनं खरेदी करू नका असे आवाहन केले. पीएम मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारसोबत राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत पाऊलं उचलत आहेत. अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांना परदेश प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. आयकर विभागाने त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक परदेश प्रवासावर एक वर्षासाठी निर्बंध घातले आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला असून केवळ आपत्कालीन स्थितीतच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.

दरम्यान, पीएम मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने विविध विभागांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापर वाढविणे, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, डिजिटल माध्यमातून बैठका घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. नव्या दौऱ्यांचे नियोजन टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभाग, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आणि शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना याबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आनंद परांजपे यांचा थोड्याच वेळात होतोय शिवसेनेत पक्षप्रवेश

New CGHS Rule: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन मेडिक्लेम नियम, आई-वडील किंवा सासू-सासरे; नंतर निर्णय बदलता येणार नाही

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, ४ वर्षांचा सुखी संसार तुटला; सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं कारण...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का पैसे? लगेच करा चेक

Mumbai Tourism : मुंबईत राहूनही तुम्ही कधीच पाहिले नसाल 'हे' ५ सीक्रेट पिकनिक स्पॉट्स, उन्हाळी सुट्टी करा एन्जॉय

SCROLL FOR NEXT