NEET UG Exam Paper Leak Update Saam Tv
Video

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

NEET UG Exam Paper Leak Update: नीट पेपर फुटी प्रकरणात राजस्थान पोलिस आणि तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली. देशभरातून १६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यामधील दोघे जण महाराष्ट्रातील आहेत.

Priya More

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात देशभरातून १६ संशयित आरोपींना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं. यामध्ये राज्यातून २ जणांचा समावेश आहे. तपास यंत्रणांनी नाशिकमधून एका आरोपीला ताब्यात घेतलं. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात एका आरोपीला नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं. ३० वर्षांचाआरोपी मूळचा नांदगावचा आहे. तो बीएएमएसचा विद्यार्थी आहे. नाशिक क्राईम ब्रांच राजस्थान पोलिसांकडे आरोपीचा ताबा देणार आहे.

राजस्थान पोलिस आरोपीचा ताबा घेण्यासाठी नाशिककडे रवाना झाले आहेत. राजस्थान पोलिसांच्या गोपनीय माहितीनुसार नाशिक क्राईम बांचने कारवाई केली. तांत्रिक माहितीद्वारे आरोपीचा फोटो मिळवून आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला. इंदिरानगर परिसरात आरोपीचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. शुभम खैरनार असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने पेहराव बदललेला असताना देखील नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT