Narendra Modi Saam Tv News
Video

Video: उद्या Narendra Modi यांच्या हस्ते वाढवण बंदरांचं भूमिपूजन

या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रशासनाची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळते.

Rachana Bhondave

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पालघर मध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून सध्या या ठिकाणी पालघर जिल्हा प्रशासन आणि जेएनपीए कडून सभा मंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. साधारणतः 40 ते 45 हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात हा सभा मंडप उभारण्यात येत असला तरी हा सभा मंडप उभारताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळते. मागील दहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या सभा मंडप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल पडला असून या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रशासनाची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळते. पालघरच्या सिडको मैदानाजवळ हा सभा मंडप उभारण्याचं काम सध्या प्रशासनाकडून हाती घेण्यात आल असून या ठिकाणी कोकण परिक्षेत्रातून 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यातील 'या' किल्ल्यावरून पाहा अरबी समुद्राचे विहंगम दृश्य

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी... 'चा परदेशात डंका; भारतासह 'या' ठिकाणी गाजणार, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या बेलपुरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

Akola Politics: अकोल्यात राजकारण तापले, MIM च्या पाचही नगरसेवकांवर कारवाई होणार; पक्षाने पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT