Bhaskar Jadhav addressing media outside Assembly after heated exchange with Speaker Rahul Narwekar Saam Tv
Video

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी; भास्कर जाधवांच्या टीकेने विधानभवनात गदारोळ| VIDEO

Bhaskar Jadhav Attacks Speaker: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

पावसाळी अधिवेशाने दोन दिवस उरले असताना आज ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीचा आरोप देखील केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरावरून प्रश्न विचारू न दिल्याने भास्कर जाधव आणि विरोधी बाकांवरील आमदार चांगलेच आक्रमक झाले. विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला.

भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेच्या उत्तरावर आक्षेप घेत 'राइट टू रिप्लाय' अंतर्गत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमांचा दाखला देत ही परवानगी नाकारली. नार्वेकरांच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले. यानंतर भास्कर जाधव हे सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी जोरदार प्रहार केला. जाधव यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने राहुल नार्वेकरांचे दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका केली. तसेच विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतःच उत्तरे द्यावीत असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT