CCTV footage captures the shocking fight between a teacher and a clerk at Saraswati Primary School, Kille Dharur, Beed. Saam Tv
Video

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

Shocking Fight Between Teacher And Clerk: बीडच्या किल्ले धारूर येथील सरस्वती शाळेत शिक्षक व लिपिकामध्ये हाणामारी झाली. पाण्याच्या वादातून सुरू झालेली ही मारहाण नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे आणखीच वाढली.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील सरस्वती प्राथमिक शाळेत चक्क शिक्षक आणि क्लर्क यांच्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिक्षक विजय काळे यांनी क्लर्क प्रदीप शेटे यांच्यावर अंगावर पाणी आल्याच्या कारणावरून मारहाण केली. यानंतर संतप्त झालेल्या लिपिकाने आपल्या नातेवाईकांना शाळेत बोलावून घेत शिक्षक विजय काळे यांना जबर मारहाण केली. ही संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, काल 1 ऑगस्ट दुपारी 12:30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

दरम्यान, अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. शाळेत विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांपुढे घडलेला हा प्रकार म्हणजे शैक्षणिक वातावरणाला गालबोट लावणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT