beed police Saam Tv
Video

Beed Police: बीडच्या पोलीस दलात आडनावाचा वापर बंद, जाणून घ्या नेमकं कारण? VIDEO

Beed Police Introduce New Identity Rule: बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आणि पोलीस विभागावरील विश्वास वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड जिल्ह्यात मागील काही काळात मराठा आणि ओबीसी आंदोलनामुळे समाजात तणाव निर्माण झाला होता. निवडणुकीदरम्यानही या दोन्ही गटांमध्ये संघर्ष दिसून आला. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचे आरोप होत होते. अशा परिस्थितीत पोलिसांची भूमिका निष्पक्ष राहावी आणि नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास दृढ व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नावासमोर आडनावाचा वापर केला जाणार नाही. सर्वांना केवळ त्यांच्या पहिल्या नावानेच संबोधित केले जाईल.

या निर्णयानुसार, पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट्स, ओळखपत्रे आणि इतर ठिकाणीही फक्त पहिले नाव दिसेल, आडनाव दर्शवले जाणार नाही.

पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या आडनावाने हाक मारली जाणार नाही. फक्त पहिल्या नावानेच संबोधन केले जाईल. या निर्णयामुळे समाजातील विविध गटांमध्ये एकात्मता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT