Gevrai News Saamtv
Video

Walmik Karad : गेवराईत कराड समर्थक आक्रमक; बीड-सोलापूर महामार्ग रोखला | VIDEO

Georai protest : खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर आता कराड समर्थक आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. परळी नंतर आता गेवराईमध्ये देखील आंदोलन सुरू झालं आहे.

Saam Tv

बीडच्या गेवराई तालुक्यात वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. याठिकाणी गेवराईच्या वडगाव फाट्यावर रस्ता रोको करण्यात आला आहे.

वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात मकोका लावला आहे. त्यानंतर आता कराड समर्थक् आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. आज परळी बंदची हाक दिलेली असतानाच आता गेवराईमध्ये देखील ओबीसी बांधवांनी बीड- सोलापूर महामार्ग अडवला असून वडगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात येत आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे. वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ओबीसी नेते परमेश्वर वाघमोडे यांच्यासह आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT