Manoj Jarange Saamtv
Video

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, पाहा Video

Manoj Jarange Accusation On Dhananjay Munde : वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर आता कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. परळी, गेवराई येथे आंदोलन करण्यात येत आहे. त्यावरून आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

सामाजिक तेढ निर्माण करतात, सामाजिक सलोखा यांना ठेवायचा नाही, जिल्ह्याची शांतता भंग करायची, खुनातला खंडणीमधल्या आरोपीला पाठबळ धनंजय मुंडेची टोळी देते, हे असले काय जवळ करायचे. हे तर डाग आहेत, फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलेत हे, अशी गंभीर टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मुंडेंचा विश्वासू वाल्मिक कराडला बीड कोर्टाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कोर्टाच्या बाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि मंत्री असून मुंडे त्याच्या घरी जाऊन भेटतो. ही जातीयवादी टोळी आहे, जातीय तेढ निर्माण करणारी टोळी आहे. धनंजय मुंडेला बीडमध्ये कायदा सुव्यवस्था नीट ठेवायची नाही, असा गंभीर आरोप करत हे सगळं मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे. गोरगरीब जनतेला त्रास नाही झाला पाहिजे. मला यांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. कोर्टाबाहेर जाऊन गोंधळ घालणार असतील आणि पोलिसांना सांगतात की पोलिसांनी आमच्यावर दादागिरी करू नये आम्ही हे सहन करणार नाही, ही भाषा आहे का धनंजय मुंडेच्या टोळीची? आता कुठे गेली तुमची संचारबंदी? या आरोपीला साथ कसे काय देऊ शकतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT