Pankaja Munde SaamTv
Video

Pankaja Munde : थेट केंद्रीय गृहमंत्र्यांशीच करणार चर्चा; बीडच्या स्थितीवर पंकजा मुंडे यांचं मोठं विधान | Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला मकोका लावल्या नंतर आता बीडचे वातावरण तापले आहे. एकीकडे देशमुख समर्थक कारवाईची मागणी करत असतानाच आता कराडचे समर्थक देखील आक्रमक झाले आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

बीडमधील तणावाच्या स्थितीवर आता पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. बीडच्या स्थितीवर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. थेट केंद्रीय गृहमंत्र्यांशी बीडच्या स्थितीवर चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. एकीकडे खंडणी प्रकरणातील आरोपी आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू समजला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीय करत आहेत. त्यासाठी आंदोलन देखील सुरू आहे. तर आता वाल्मिक कराड याचे समर्थ देखील आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्हा सध्या पेटला आहे. कराड समर्थकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीड, परळी, मस्साजोग, गेवराई येथे तणावपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे. असं असतानाच आता पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बीडच्या प्रकरणावर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मी सध्या माझ्या नियोजित दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मला याबद्दल काही माहीत नाही. पण बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबद्दल मी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT