Beed Crime Saam Tv
Video

Beed Crime : बीडमध्ये थरार, शोरूममध्ये कोयता घेऊन तो मालकाच्या दिशेने चालून गेला अन्... VIDEO

Beed News : भर दिवसा हातात कोयता घेऊन एक हल्लेखोर एका शोरूममध्ये घुसला. हल्लेखोराने कोयत्याने शोरूमच्या मालकावर हल्ला केला. ही घटना बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात हद्दीत घडली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडच्या धारूर शहरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातात कोयता घेऊन शोरूम मालकाला मारण्याच्या उद्देशाने आलेला एक जण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्याने कोयता शोरूमच्या काचेच्या दरवाजावर मारल्याने दरवाजा फुटला. हल्लेखोराला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या संदर्भात शोरूम मालकाच्या तक्रारीवरून आरोपी अनिल भगवान चाटे याच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिल्यानंतर पुन्हा आरोपीने येऊन धमकी दिल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे धारुर शहरात दहशत निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT