Banjara community protest against Dhananjay Munde Saam Tv
Video

Dhananjay Munde: 'ते विधान मागे घ्या' बंजारा समाज भर सभेत धनंजय मुंडेंवर भडकले|VIDEO

ST Reservation Demand Banjara Community: जालना येथे बंजारा समाजाचा मोठा मोर्चा भरला असून, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘वंजारा-बंजारा एक आहे’ या विधानावर समाज संतप्त झाला आहे.

Omkar Sonawane

बीड येथे आज बंजारा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी करत मोठा मोर्चा निघाला होता. यावेळी मोर्चात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाषणा दरम्यान एक वक्तव्य केले यावरून चांगलाच वाद उफाळला. धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाबाबत केलेल्या विधानात म्हटले की बंजारा आणि वंजारा एकच आहे, या शब्दांमुळे समाजाचे काही बांधव संतप्त झाले होते आणि मोर्चामध्ये आक्रमक होत घोषणाबाजी केली आहे.

बंजारा समाजाचे बांधव म्हणतात की, वंजारा-बंजारा एक नाही. यापूर्वीच आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले गेले आहे. आता अशा विधानामुळे समाजात गैरसमज निर्माण होत आहे. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या वक्तव्यावरून मागणी केली आहे की, धनंजय मुंडे यांनी ‘वंजारा-बंजारा एक आहे’ हा शब्द मागे घ्यावा. मोर्चामध्ये घोषणाबाजी करत समाजाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

Pakistan Protest: जेन झी मैदानात पाकिस्तानात सत्तापालट? नेपाळनंतर पाकमध्येही तरुणाई आक्रमक

Banjara Reservation: बीड जालन्यातून बंजारा समाजाचा हुंकार, हैदराबाद गॅझेटियरमुळे सरकारची कोंडी

Chandrapur: शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप; पाहा VIDEO

Vomiting In Bus: बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात?

SCROLL FOR NEXT