Donald Trump Bull Saam Tv
Video

Donald Trump Bull: ७०० किलोचा 'ट्रम्प रेडा', नेमका आहे तरी कोण?

Donald Trump: सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय तो म्हणजे ट्रम्प रेडा. ७०० किलो वजनाच्या या रेड्याला पाहण्यासाठी सर्वांनीच मोठी गर्दी केली आहे. हा ट्रम्प रेडा आहे तरी कोण हे आपण पाहणार आहोत...

Priya More

जगात असा कुणीही नसेल ज्याला डोनाल्ड ट्रम्प माहित नसेल. मात्र ट्रम्प यांच्यामुळे असाच एक रेडा मोठ्या चर्चेत आलाय. कसा आणि कुठे आहे हा रेडा ? पाहूयात हा रिपोर्ट...

दिसायला गोरापाण. आगानं गुबगुबीत. डोळं निळं झ्यार. केसांची स्टाईल वनसाईड. तोंडवर करुन बघायची स्टाईल बघितल्यावर कुणाची आठवण येतीय हं. बरोबर या रेड्याची सोशल मीडियावर ट्रम्प रेडा म्हणून जोरदार चर्चा हाय...

सध्या ह्यो रेडा चांगलाच भाव खावून गेलाय. बांगलादेशच्या बाजारात ह्यो ट्रम्प रेडा आलाय. जसा ट्रम्पचा रुबाब तसाच या रेड्याचा रुबाब हाय. पठ्ठ्याचं केस इचरायला एक माणूस. हिंडवायला एक माणूस अन् आंघुळीला एक माणूस. जशी ट्रम्पच्या सुरक्षेसाठी फौज तशी रेड्याच्या दिमतीला माणसं. पण दोघात एक फरक. तात्याचं असंल जगात वजन. पण ह्यो रेड्यापण वजनात हाय.

200 -300 नाय तर ह्यो जनावर हाय 700 किलोचं. पठठ्याचं फॅन ट्रम्प तात्या पेक्षा जास्त. जो येई तो सिल्फी काढल्या शिवाय काय पुढं जात नाईत. एकीकडं ट्रम्पनं उत आणलाय पण या रेड्यानं लोकांच्या तोंडावर हसू आणलंय असो. असं म्हणत्यात जगात एकसारखी सात माणसं दित्यात पण माणसासारखं प्राणी बी दिसायला लागल्यात ही पहिलीच येळ असल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT