बदलापूरातील शाळेत एका अल्पवयीन मुलीवर, अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने अतिप्रसंग केला, या घटनेनंतर बदलापूर शहरात एकच खळबळ माजली. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत लाखो बदलापूरकर काल रस्त्यावर उतरले.पोलिस प्रशासनालाही न जुमानता काल लाखोंच्या जनसमुदायाने बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या मांडत रेल रोको केला. पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर आता त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलीये. त्याचा मुक्काम आणखी पाच दिवस वाढला आहे. आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली आहे. एसआयटी पथकाने दुसरीकडे पिडीतेच्या घरी भेट देत चर्चा देखील केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.