28 तारखेला राज्यभरातील लाखो मजूर, शेतकरी या मोर्चासाठी येणार आहेत कर्जमाफीची हमीभावाच्या संदर्भात दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या संदर्भात जोपर्यंत निर्णय घेत नाही आम्ही मागे हटणार नाही. काहीही झालं तरी पंजाबच्या धरतीवर ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्या ताकतीने हे आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे. असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
ईव्हीएमच्या विरोधात एकत्र येऊनच आपण आंदोलन केलं पाहिजे ही चांगली गोष्ट आहे मुळात हे रोप आणलं कोणी? काँग्रेसने आणले आहे. काही गरज तर नव्हती तेव्हा त्याचाच आता वटवृक्षात रूपांतर बीजेपीने केलेला आहे. तेव्हा नरेंद्र मोदी म्हणत होते. ईव्हीएम मशीन बेकार आहे. हे लोकशाहीला घातक आहे आणि आता हेच त्याचा वापर करून ते शस्त्र बनवत आहेत म्हणजे सर्वांना संपवण्यासाठीच विचार केलेला आहे. जो व्हीव्हीपॅट तुम्हाला दिसतो त्याच्यावरील चिन्ह दिसतं ते आमच्या हाती द्या त्याला नंबर टाका. उद्या जर तुम्हाला म्हटलं की माझं मतदान दाखवा तर तुम्हाला मिळालं की नाही मिळालं हे दाखवू शकतं. असे कडू म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.