Bachchu Kadu News SaamTv
Video

Bachchu Kadu : 'मतदारसंघ शिवसेनेकडे; उमेदवार ठरवतो भाजप', बच्चू कडूंचा मोठा आरोप

Saam Tv

'जागा वाटपात भाजपने शिंदे गटात केलेला हस्तक्षेप लोकसभेला मारक ठरला', असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात सगळे अहवाल असताना देखील भाजपने त्यांना तिकीट दिलं. मात्र शिंदे गटाला तिकीट देताना सर्व्हेचा नियम लावला, असंही बच्चू कडू यांनी म्हंटल आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे आमदार विधानसभेला शरद पवारांकडे जाऊ शकतात, असा दावाही कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ''लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा पडतील हे सगळ्या सर्व्हेमध्ये स्पष्ट असताना देखील भाजपने सगळे विरोध पाहूनही त्यांना तिकीट दिलं. मात्र शिंदे गटाच्यावेळी सर्व्हे बरोबर नाहीत म्हणून तिकीट देताना नियम लावले. त्यामुळे जागा वाटपात भाजपने केलेला हा हस्तक्षेप शिंदे गटाला लोकसभेत मारक ठरला आहे. म्हणजे मतदारसंघ शिवसेनेकडे अन् उमेदवार ठरवतो भाजप, अशी परिस्थिति आहे.'' असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केलं आहे. तर आगामी विधानसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आमदार शरद पवार यांच्या गटात जातील असा दावा देखील कडू यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT