Salman Khan News Salman Khan News
Video

Baba Siddique Death News : मुंबई पोलीस सतर्क, सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

Salman Khan News: लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Namdeo Kumbhar

Baba Siddique Death News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन ते चार जणांनी धडाधड गोळ्या झाडल्या. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरांना अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे. लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं उघड झाले आहे. सलमान खान हा या गँगच्या रडारावर पहिल्यापासून आहे. अनेकदा त्याला धमक्याही आल्या आहेत. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे जवळचे संबंध होते. पोलिसांनी तात्काळ सलामान खान याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलाय.

अभिनेता सलमान खान याला सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी मिळताच रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांची मैत्री सर्वश्रुत आहे. बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार जीशान सिद्दिकी याचे सांत्वन करण्यासाठी सलमान रात्री अडीच वाजता वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT