Aurangabad news  Saam Tv
Video

Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर अचानक पोलिसांच्या छावणीत, 600 जवानांचा बंदोबस्त; नेमकं कारण काय?|VIDEO

Hanuman Jayanti : औरंगेजबाच्या कबरीवरून सध्या राज्यात तनावाची परिस्थिति असल्यामुळे उद्याच्या हनुमान जयंती निमित्त खुलताबाद येथील औरंजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आले आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये आता दोन दिवस ६०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. हनुमान जयंती निमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. हनुमान जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी आणि शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मंदिर परिसर आणि संपूर्ण खुलताबादमध्ये ६०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तसेच खुलताबादच्या दिशेने मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांना शनिवारी मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंध घालण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खुलताबादमधील औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आहे. राजकीय नेत्यांकडून यावरून वाद‌ग्रस्त वक्तव्य झाले. नागपूरमध्ये तणाव निर्माण झाल्याने यंदाच्या हनुमान जयंतीला पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हनुमान जयंतीला दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी नुकताच बंदोबस्ताचा आढावा घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी असतील. त्यांच्या नेतृत्वात २ पोलिस निरीक्षक, १७ सहायक निरीक्षक,उपनिरीक्षक, १६८ पोलिस अंमलदार, एक दंगा काबू पथक, जवळपास १०० पेक्षा अधिक एसआरपीएफचे सशस्त्र जवान, ३९८ होमगार्ड ४८ तास तैनात असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT