Atal Setu SAAM TV
Video

Atal Setu Potholes : १७ हजार कोटींच्या अटल सेतूवर खड्डेच खड्डे | पाहा VIDEO

Atal Setu Navi Mumbai : सुमारे 17 हजार कोटी रुपये खर्च करत बांधलेल्या अटल सेतूवर अवघ्या काही महिन्यांतच खड्डे पडले आहेत. नवी मुंबईच्या दिशेनं 3 ठिकाणी मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोठा गाजावाजा करून आणि तब्बल १७ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या अटल सेतूवर अवघ्या काही महिन्यांतच खड्डे पडल्याने संताप व्यक्त होत आहे. नवी मुंबईच्या दिशेने तब्बल ३ ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सध्या एमएमआरडीएतर्फे सुरू आहे.

मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ १२ मिनिटांत पार करण्यासाठी २१.८ किमी लांबीचा अटल सेतू बांधण्यात आला होता. या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ रोजी झाले होते. मात्र लोकार्पणानंतर अवघ्या १८ महिन्यांतच सेतूवर मोठे खड्डे पडल्याने या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT