Advocate Asim Sarode suspended for three months after making controversial remarks against the Governor and judiciary. Saam Tv
Video

मोठी बातमी! अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द, 'ते' वक्तव्य भोवलं|VIDEO

Bar Council Action Against Asim Sarode: पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. राज्यपाल आणि न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, सरोदे यांनी आपल्या भाषणात 'फालतू' असा शब्द वापरल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली. या वक्तव्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती, ज्यानंतर बार कौन्सिलने त्यांच्यावर तीन महिन्यांसाठी वकिली करण्यावर बंदी घातली आहे. या कारवाईमुळे सरोदे यांना मोठा धक्का बसला असून, उच्च पदावरील व्यक्तींवरील टीकेमुळे त्यांना हा परिणाम भोगावा लागल्याची चर्चा आहे.

असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. मात्र आता त्यांची सनद रद्द झाल्याने त्यांना न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही,

असीम सरोदे यांची सनद का रद्द झाली?

असीम सरोदेंनी एका जाहीर कार्यक्रमात न्यायव्यवस्थेविषयी टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे आणि निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात. तसेच राज्यपाल हा फालतू आहे असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT