नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर राहिल्या आहेत. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होतेय. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः चाकणकरांची चौकशी करीत आहेत. याचदरम्यान एसआयटीच्या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करणार असून त्यांना जी माहिती हवी असेल ती देणार आहे, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी चौकशीला जाण्याआधी दिली होती. समता पतसंस्थेतील सर्व खाती बनावट होती’ असा गंभीर दावाही त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे SIT तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान चौकशीला जाण्याआधी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे, त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देणार. या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य राहील. पोलिसांना जी मदत हवी असेल तपास अधिकाऱ्यांची जी काही प्रश्न असतील त्याला सहकार्य करेन. अशोक खरात यांना चाकणकर यांनी पाठीशी घातलं होतं, अशी टीका केली जात होती. त्यावरून बोलताना चाकणकर म्हणाल्या, त्या अनुषंगाने आज तपास होणार आहे. अनेक शंका सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.