Kolhi community members bravely rescue devotees from Chandrabhaga River during Ashadhi Wari in Pandharpur. Saam Tv
Video

Pandharpur News: चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा, ६ वारकरी बुडताना वाचले, कोळी बांधव देवदूत म्हणून धावले|VIDEO

Chandrabhaga River Drowning Rescue: आषाढी वारीसाठी आलेले सहा वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करताना खोल पाण्यात गेले. मात्र कोळी समाजातील तरुणांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवलं. त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Omkar Sonawane

आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणावर पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली असतानाच चंद्रभागा नदीत स्नान करताना बुडणाऱ्या सहा वारकऱ्यांचे प्राण येथील कोळी समाज बांधवांनी वाचवले. जिल्हा प्रशासनाने नियोजित केलेल्या मदत पथकातील कोळी बांधवांनी प्रसंगावधान राखून तत्काळ नदीपात्रात उडी घेतली आणि सर्व भाविकांना सुखरूप बाहेर काढले.

स्नानासाठी गेलेले वारकरी पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले होते. अचानक पाय घसरल्याने बुडण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र, कोळी समाजातील तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने चंद्रभागेत स्नान करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोळी समाजाच्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT