Devotees chanting “Vitthal Vitthal” as they queue for darshan at the beautifully decorated Vitthal-Rukmini Temple in Pune on Ashadhi Ekadashi morning. Saam Tv
Video

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Pune News: आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली असून, पहाटेपासून एक किलोमीटरची दर्शन रांग लागली आहे. मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली असून परिसरात भक्तिरस दरवळतो आहे.

Omkar Sonawane

पुणे: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" असा जयघोष सुरु असून, श्रद्धेचा महापूर उसळलेला पाहायला मिळत आहे. मंदिरात पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरापर्यंत सुमारे १ किलोमीटरची दर्शन रांग लागली असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला आहे.

मंदिराला आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आले असून, आषाढी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT