Marathwada vidarbh jobs Saam TV
Video

Upcoming jobs : मराठवाडा - विदर्भातील तरूणांना बाप्पा पावले; ३० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध

Big Budget Projects In Marathwada And Vidarbha : राज्यात ४ मोठ्या प्रकल्पांना मिळालेल्या मान्यतेने लवकरच मराठवाडा आणि विदर्भातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. तब्बल १ लाख १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ३० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

Saam Tv

मराठवाडा आणि विदर्भातील तरूणांना गणपती बाप्पा पावला असून राज्यात ४ मोठ्या प्रकल्पांना मिळालेल्या मान्यतेने लवकरच मराठवाडा आणि विदर्भातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साधारण ३० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल परिसरात हे चार प्रकल्प येणार आहेत. यामध्यमातून तब्बल १ लाख १७ हजार कोटींची आर्थिक उलाढाल आणि गुंतवणूक होणार असल्याने या प्रकल्पातून बेरोजगार तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

यात पनवेलमध्ये तळोजा एमआयडीसी येथे अदानी समूहासह टॉवर सेमीकंडक्टर ८३,९४७ कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामधून ॲनालॉग/मिक्स्ड सिग्नल आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर, हायब्रीड वाहने, प्लगइन हायब्रिड वाहने, fuel cell EV, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी यासारख्या उत्पादनांची निर्मिती करणार आहे. यामध्ये एकूण २१,२७३ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. रोजगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यातून १२००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतीत. त्याच बरोबर अमरावतीमध्ये रेमंड लक्झरी कोटन्सचा प्रकल्प येणार आहे. त्यामुळे ५५० थेट नोकऱ्या येथील तरूणांना उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT