Anil Parab addressing the media after raising the controversial ‘Chaddi Banian Gang’ video issue in the Maharashtra Legislative Council. Saam Tv
Video

Maharashtra Politics: 'चड्डी बनियन गँग' ते शिरसाटांचा बेडरुम व्हिडिओ; विधान भवनात अनिल परब यांचा हल्लाबोल, VIDEO

Anil Parab Comments On Sanjay Shirsat Viral Video: संजय शिरसाट यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विधान परिषदेत अनिल परब यांनी जोरदार घणाघाती भाषण केलं. त्यांनी मंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एसआयटीमार्फत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मंजूर झाले असून आता यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधला एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये संजय शिरसाट हे बनियनवर होते आणि सोबतच एक पैशांची बॅग देखील होती. यावरूनच अनिल परब यांनी विधानपरिषदेमध्ये मंत्र्यांच्या सुरक्षेतेवर प्रश्न उपस्थित केले.

परब म्हणाले, जनसुरक्षा बिलावर नेत्यांनी इथे मोठमोठी भाषणे केली. प्रविण दरेकरांनी तर दोन अडीच तास भाषण करून हा किल्ला लढवून हे विधेयक किती चांगले आहे हे सांगितले आणि जनतेची सुरक्षा करू याबाबत सविस्तर मांडणी केली.परंतु जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला पहिले मंत्र्यांची सुरक्षा करा. कारण चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँगचे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरता आहे. एखाद्या मंत्र्याचे बेडरूममधील व्हिडिओ जर बाहेर येत असेल तर मंत्रीच सुरक्षित नाही तर जनतेचे काय? ज्या मंत्रीला इनकम टॅक्सची नोटीस आहे.

त्यांची पैशाच्या बॅगेसोबत जर व्हिडिओ बाहेर येत असेल तर ही मोठी गंभीर बाब आहे. म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून हा आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा? हे फॉरेन्सिकला पाठवून याची माहिती घ्यावी आणि यावर एसआयटी स्थापन करावी अशी मागणी अनिल परब यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT