दिवाळीच्या दिवशी रात्री अमरावती शहरातील कालीमाता मंदिरात मागील ३९ वर्षांपासून भक्तांना चक्क पैशांचा प्रसाद देण्यात येतो. त्यामुळे येथे दर्शनासाठी दिवाळीच्या दिवसांमध्ये भक्तांची मोठी रीघ लागलेली असते. काली माता मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. कारण या मंदिरात भक्तांना प्रसाद स्वरूपात चक्क पैशांचे वितरण करण्यात येते. या मंदिराचे पुजारी येणाऱ्या भक्तांना लाह्यांसोबत पैसेही वाटतात.
काली माता मंदिराचे पुजारी शक्ती महाराज सांगतात की, '१९८४ पासून अमरावती स्मशानभूमी परिसरातील काली माता मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या ठिकाणी लाह्यांसोबत दिवाळीच्या निमित्ताने पैशाच्या प्रसादाचे वितरण करण्यात येते. याचं कारण सांगताना शक्ती महाराज म्हणतात की, येथील पैसे आपल्या दुकान, घर आणि तिजोरीमध्ये ठेवल्यास बरकत मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन आटोपून भाविक प्रामुख्याने या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.