Amol Kolhe On NCP Merger Saam Tv
Video

Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले...

Amol Kolhe On NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता अमोल कोल्हे यांनीच स्पष्टीकरण दिले.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी साम टीव्हीला दिलेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखतीमध्ये आमदार रोहित पवारांनी केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, असं विधान रोहित पवार यांनी केले. रोहित पवारांच्या या दाव्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'या सगळ्या गोष्टींवर मी आधीपण बोललो आहे. जे काही ठरले होते ते आता पब्लिक डोमेनवर बऱ्यापैकी आले आहे. आज रोहित पवारांनी सांगितलेली गोष्ट या आधी देखील पब्लिक डोमेनमध्ये आलेली आहे. या चर्चा झाल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे की या चर्चा झाल्या होत्या. मी अगदी ठामपण सांगतो कारण मला आठवतंय १६ मेला बारामती ते पुणे हा प्रवास माझा दादांसोबत झाला होता. १६ मेपासून मी या प्रोसेसमध्ये आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचारसभा संपवून अजितदादा आणि मी सोबत प्रवास केला होता. हे जे काही टप्पे घडले आहेत विलिनीकरणासंदर्भात १४ बैठका झाल्या आहे. यातील ११ बैठका जयंत पाटील यांच्या घरी झाल्या. ही सगळी वस्तुस्थिती आहे. महत्वाची गोष्ट ही की, कालही आमच्या नेत्या सु्प्रिया सुळे यांनी देखील सांगितले की, ज्यांच्यासोबत चर्चा केली दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाहीत. काय चर्चा झाली होती?, कशासाठी चर्चा झाली होती? यासर्व गोष्टींविषयी बोलणं काही हशिल वाटत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT