Amit Thackeray : दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.  Saam tv
Video

Amit Thackeray Exclusive : विषय संपला! दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray-Uddhav Thackeray : दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. ते नेमके काय म्हणाले? बघा एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ.

Nandkumar Joshi

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रात निवडणुका (Maharashtra Election) आल्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना उधाण येतं. पण आता अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीच याबाबतच्या चर्चांना जवळजवळ पूर्णविराम दिला आहे. दोन ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत. माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

२०१४ साली आणि २०१९ मध्येही दोन ठाकरे (Raj Thackeray - Uddhav Thackeray) एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. आधी 'टाळी' कुणी द्यायची याबाबत बरीच खलबते झाली होती. पण काही कारणास्तव ही चर्चा थांबली. आता २०२४ मधील विधानसभा निवडणुकीतही पुन्हा दोन ठाकरेंनी एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण अमित ठाकरेंनी या चर्चेला 'फुलस्टॉप' दिला. दोन भाऊ एकत्र यावेत ही चर्चा माझ्यासाठी संपली. २०१४ आणि २०१९ मध्ये प्रयत्न झाले होते. मलाही वाटायचं. पण नंतर तो विषय माझ्यासाठी संपला असून, माझ्याकडून तरी किमान यापुढे चर्चा नाही, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Maharashtra News Live Update: शिवसेना कोणाची? सुनावणी संपली, १६ तारखेला शिंदे गट पुन्हा करणार युक्तीवाद

SCROLL FOR NEXT