Alandi Bandh Saam Tv
Video

Alandi Bandh: आज आळंदी बंद, नरागाध्यक्षांचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Diveagar Accident: दिवेआगार येथे आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर आळंदी बंद ठेवण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला आहे.

Priya More

दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण आळंदी शहरावर शोककळा पसरली आहे. या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता आळंदी बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आळंदीतील विद्यार्थ्यांच्या दिवेआगर सहलीदरम्यान समुद्रात बुडून बारावीच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रशांत कुन्हाडे यांनी आळंदी बंदचं आवाहन केलं आहे. २ ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी, व्यावसायिक, संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं. तसेच शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत दिवंगत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावात ‘नो UPI डे’; MDR शुल्काच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे गांधीगिरी आंदोलन

Pith Girni Anudan: महिला आणि बेरोजगारांना सरकारचं गिफ्ट; पीठ गिरणीसाठी देणार 90 टक्क्यांपर्यंत अनुदान, कुठे कसा कराल अर्ज?

EPFO New Rules: 25 हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर PF अनिवार्य; कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

Thane News: पूर्णकर प्रकरणावरून आरोप होणाऱ्या शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, थेट ठाकरेंवरच केला गंभीर आरोप

Pitru Paksha: पितृ पक्षात हे 3 संकेत मिळणं फारच अशुभ; पितर नाराज असल्याची असतात लक्षणं

SCROLL FOR NEXT