PM Modi reviews NEET re-exam preparations amid heightened security measures after paper leak controversy. Saam tv
Video

NEET Protest : इंग्रज तरी ऐकायचे, हे सरकार तर...; माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

NEET protest outside Parliament latest news : दिल्लीतील NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Namdeo Kumbhar

NEET परीक्षा घोटाळा आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून समाजवादी पक्षाचे (SP) प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. आमच्या खासदारांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले आहे आणि बाहेर निष्पाप विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे," असा थेट आरोप करत त्यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. अखिलेश यादव यांनी NEET च्या विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देण्याची आणि आंदोलन करणाऱ्या तरुणांशी प्रशासनाने योग्य आणि आदराची वागणूक ठेवण्याची मागणी केली आहे.

जेव्हा लोक आंदोलन करायचे, तेव्हा इंग्रजसुद्धा त्यांचे ऐकून घ्यायचे. म्हणूनच आज जगभरात महात्मा गांधींचे नाव आदराने घेतले जाते, कारण त्यांनी जगाला आंदोलनाचा मार्ग दाखवला. पण हे सरकार ज्या पद्धतीने आंदोलकांना हटवत आहे, ते पाहता या सरकारला शेवटी अत्यंत अपमानास्पदरित्या सत्ता सोडावी लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचे बीड कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या जामिनाला सरकारचा विरोध; ६ लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची सेशन्स कोर्टात सुनावणी

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

SCROLL FOR NEXT