Ajit Pawar On Ladki Bahin Yojana. Saam Tv
Video

Ajit Pawar Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २,१०० मिळणार? अजित पवार थेट म्हणाले, आमची परिस्थिती..

Ladki Bahin Yojana : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. त्यांनी लाडक्या बहिणींना २,१०० रुपये मिळणार की नाही याचे उत्तर देखील दिले.

Yash Shirke

Ajit Pawar : 'लाडक्या बहिणींना २,१०० देणार नाही असे आम्ही म्हटले नाही. पण आर्थिक परिस्थिती पाहून लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देऊ', असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार म्हणाले, आम्ही असं म्हटलं नाही, की आम्ही २,१०० रुपये देणार नाही. आम्ही ते देणार आहोत, आर्थिक परिस्थिती बघून आम्ही पैसे देऊ. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्या पद्धतीने आमचं काम सुरु आहे. आमच्या लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देणार आहोत. सध्या आम्ही कबूल केल्याप्रमाणे १,५०० रुपये देतोय. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही २,१०० रुपये देऊ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT