NCP leaders raise serious questions over Ajit Pawar plane crash, demanding a transparent investigation Saam Tv
Video

विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे? ऐनवेळी पायलट का बदलला? अजित दादांचा घातपात? दोन बड्या नेत्यांना दाट शंका|VIDEO

Ajit Pawar Death Conspiracy Theory Maharashtra Politics: अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पायलट बदल, सहावी व्यक्ती कुठे आणि घातपाताचा संशय व्यक्त करत राष्ट्रवादीतील नेत्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. मात्र हा अपघात होता की घातपात, असा गंभीर सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधीलच नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. आमदार अमोल मिटकरी आणि नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी या दुर्घटनेबाबत अनेक संशयास्पद बाबी समोर आणल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी अपघातापूर्वीच्या घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नियोजित फ्लाइट सकाळी 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश हे दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र दोघांनाही एकाच वेळी उशीर होणं, त्यानंतर अचानक पायलट बदल होणं आणि या सगळ्या घडामोडींची सविस्तर व पारदर्शक माहिती अद्याप सार्वजनिक न होणं, यामागे नेमकं काय कारण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे गंभीर संशय व्यक्त केला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असताना प्रत्यक्षात घटनास्थळावरून केवळ पाच मृतदेहच सापडल्याची माहिती समोर आली आहे. मग सहावी व्यक्ती नेमकी कुठे गेली, असा थेट प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

या दोन्ही नेत्यांच्या आरोपांमुळे अजित पवारांच्या मृत्यूभोवतीचं गूढ अधिक गडद झालं असून, हा अपघात होता की नियोजित घातपात याबाबत आता राज्यभरात चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT