Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar News : अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकं काय झालं? | Inside Story

Ajit Pawar Meet Sharad Pawar in Delhi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी त्यांचात काय चर्चा झाली याबद्दल अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. याचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज दिल्लीत काका शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीमध्ये अचानक त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान अजित पवार यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते.

या भेटीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेतीबद्दल आता अजित पवार यांनी खुलासा केला आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ही अनौपचारिक भेट होती. या भेटीदरम्यान कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नाही. आज त्यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत, असं अजित पवार यांनी म्हंटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT