Maharashtra politics latest news : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar News) यांनी पुन्हा एकदा बारामतीमधून माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. बारामतीमध्ये बोलताना असताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर भावनिक आवाहन केले. यंदाच्यावेळी मी जो उमेदवार देईल, त्याला तुम्ही निवडून आणायचेय. हा आमदार कसा आमदार निवडून आणायचा हे तुम्ही ठरवायचा, असे भावनिक आवहान अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलेय. (maharashtra assembly election 2024)
आगामी विधानसभा निवडणुकीत (2024 Maharashtra Legislative Assembly election) अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे संकेत दिले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेय. अजित पवार यांनी बारामतीमधून माघार घेतली, तर तेथून कुणाला उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.