Air India Plane Crash Roshni Sonaghare funeral in Dombivli  Saam TV News
Video

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील हवाई सुंदरी रोशनीला अखेरचा निरोप, डोंबिवलीत शोकसागर

Air India Plane Crash Roshni Sonaghare funeral in Dombivli : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी रोशनी सोनघरेला डोंबिवलीत अश्रूपूरित निरोप देण्यात आला.

Namdeo Kumbhar

Roshni Sonaghare funeral in Dombivli : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेली हवाई सुंदरी रोशनीला अखेरचा निरोप देण्यात आला. रोशनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी डोंबिवली आणि परिसरात शोकाकुल वातावरण होते.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिची अंत्ययात्रा आज डोंबिवलीतील न्यू अमिया सोसायटी येथून निघाली. सकाळी तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले, तेव्हा कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, एअर इंडियाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. शोकाकुल वातावरणात अश्रूंना बांध फुटला. दर्शनानंतर स्वर्ग रथातून तिची अंत्ययात्रा शिवमंदिर परिसरातील स्मशानभूमीकडे रवाना झाली, जिथे अंत्यसंस्कार झाले. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर आठवड्याने रोशनीचे पार्थिव काल कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. डोंबिवलीत शोककळा पसरली असून, रोशनीच्या आठवणींनी सर्वजण व्यथित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT