आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI मुळे येत्या दशकात वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कॅन्सर, अल्झायमर, हृदयविकार आणि मानसिक आजारांसारखे गंभीर आजार पुढच्या १० वर्षांत इतिहासजमा होऊ शकतात, असा मोठा दावा अँथ्रोपिक या AI कंपनीचे सीईओ डारियो अमोडेई यांनी केला आहे. AI मुळे रोगांचं लवकर निदान, औषध संशोधन आणि उपचारांच्या विकासासाठी AI महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. पुढील दशकात हे गंभीर आजार पूर्णपणे संपतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
डारियो अमोडेई यांना असा विश्वास आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स औषधे शोधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणू शकते ज्यामुळे आरोग्यसेवेत मोठी प्रगती होईल. तज्ज्ञ या दाव्याबद्दल साशंक आहेत. त्यांच्या मते सध्याच्या एआय मॉडेल्समध्ये आवश्यक जैविक ज्ञानाचा अभाव आहे. र्करोग आणि अल्झायमर हे अज्ञात आजार नाहीत. ते लाखो कुटुंबांना प्रभावित करतात. यापैकी काही आजार आजही वैद्यकशास्त्रासमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.