DNA Tests saam tv
Video

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातातील 8 प्रवाशांची DNA टेस्टद्वारे ओळख पटली, मृतदेह नातेवाईकांकडे सोपवलं|VIDEO

Ahmedabad Crash: अहमदाबाद विमान अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येत आहेत. डीएनए टेस्टसाठी मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रांगा लावल्या आहेत.

Omkar Sonawane

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर मृतांची ओळख पटवणे मोठं आव्हान ठरत आहे. विमान कोसळल्यानंतर झालेल्या प्रचंड स्फोटामुळे मृतदेह अक्षरशः ओळखू न येण्याइतपत जळाले आहेत. त्यामुळे सध्या मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्यांचा आधार घेतला जात आहे. या प्रक्रियेसाठी मृतांच्या नातेवाईकांना अहमदाबाद येथील रुग्णालयामध्ये बोलावण्यात आले असून, तेथे डीएनए नमुने देण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. हा क्षण नातेवाईकांसाठी अत्यंत भावनिक आणि वेदनादायक ठरत आहे.

या भीषण दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६३ प्रवाशांचा समावेश आहे. मृतांच्या आकड्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासन, बचाव पथकं आणि वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू ठेवलं असून, ओळख पटवलेले मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात आहेत. दरम्यान, दुर्घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिकृत तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT