Jyoti Chandekar Death Saam Tv
Video

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थिती! VIDEO

Jyoti Chandekar Death: अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आई ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पुण्यात ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईला अखेरचा निरोप देत असताना तेजस्विनीला अश्रू अनावर झाले.

Priya More

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अंत्यविधी केला. यावेळी तिने आईला मुखाग्नी दिला. आईला निरोप देताना तेजस्विनी पंडितला अश्रू अनावर झाले. यावेळी तेजस्विनी ढसाढसा रडू लागली. तिला पाहून उपस्थितांना देखील रडू आवरले नाही.

ज्योती चांदेकर यांच्या अंत्यविधीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते. तसंच, मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल पुण्यात निधन झालं होतं. अल्पशा आजाराने त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे अभिनेत्री तेसज्विनी पंडितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Maharashtra News Live Update: सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

SCROLL FOR NEXT