Ritesh Deshmukh SaamTv
Video

Riteish Deshmukh News: विधानसभेला झापुक-झूपूक झालं पाहिजे; रितेश देशमुखने सभा गाजवली

Dheeraj Deshmukh Campaign Rally : रितेश देशमुख याने धाकटा भाऊ आणि लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांची प्रचार सभा जोरदार डायलॉगबाजी करून चांगलीच गाजवली आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली.

Saam Tv

पिका पाण्याला भाव आहे का? रोजगार द्यायची जिम्मेदारी कुणाची आहे? असा सवाल करत लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापुक-झुपुक झाल पाहिजे, असं म्हणत अभिनेता रितेश देशमुख यांनी लहान भावाची प्रचार सभा गाजवली आहे. लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश देशमुख याने युवकांचा मेळावा घेतला. यावेळी रितेश देशमुख यांने नाव न घेता विरोधकांवर टीका केली आहे.

लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश देशमुख याने युवकांचा मेळावा घेतला आहे., यावेळी रितेश देशमुख यांने नाव न घेता विरोधकांवर टीका केली आहे.. सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. मात्र जे लोक असं म्हणतात त्यांचा पक्षच धोक्यात आहे. ते धर्माला प्रार्थना करतात की आम्हाला वाचवा. त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, असं म्हणणाऱ्यांना तुम्ही प्रश्न करा की धर्माच आम्ही बघू तुम्ही आमच्या कामाचं बघा, या शब्दात अभिनेता रितेश देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

धीरज देशमुख यांचं एक नंबरला बटन आहे, त्यामुळे ते आमदार तर होणारच आहेत. यावेळेस एवढ्या जोरात बटन दाबा की, पुढच्या वेळेसच विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला झापुक-झूपूक झालं पाहिजे, असं म्हणत त्यांनी भाजपाचे ग्रामीणचे उमेदवार तथा विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यावर नाव न घेता अभिनेता रितेश देशमुख याने निशाणा साधला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT