अनेक हत्या प्रकरणांत आरोपी असलेला विजय पालांडे याने सोमवारी ॲड. उज्ज्वल निकम यांना कोर्टात आव्हान दिलं आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्ती विरोधात आरोपी विजय पालांडे याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे पालांडेने अर्जात म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदललेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडे याने याचिकेत म्हटलं आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल, असे पालांडेने अर्जात म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.