Argentina Earthquake saam tv
Video

Argentina Earthquake: अर्जेंटीनात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, पाहा VIDEO

Earthquake Alert: अर्जेंटिना आणि चिलीमध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. समुद्र किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. सध्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुक्रवारी २ मे रोजी, अर्जेंटिना आणि चिलीच्या किनाऱ्याजवळ एक तीव्र भूकंप झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ नोंदवली गेली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंप समुद्राच्या आत झाला, ज्यामुळे आसपासच्या क्षेत्रात हालचाल जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू चिली आणि अर्जेंटिनाच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या समुद्रात होता.

यापैकी कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळाली नाही, परंतु अधिकाऱ्यांनी परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एका अहवालानुसार, चिलीच्या किनाऱ्यावर ३-९ फूट उंचीच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर अंटार्क्टिकाच्या काही भागांमध्ये १-३ फूट उंचीच्या लहान लाटा येऊ शकतात.

ड्रेक पॅसेज जो १००० किलोमीटर रुंद आहे. दक्षिण अमेरिकेच्या सर्वात दक्षिण बिंदू केप हॉर्न आणि अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या उत्तरेस १६० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण शेटलँड बेटांमधून अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो. या लाटा समुद्राच्या स्थितीवर प्रभाव टाकू शकतात.

यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया शहरापासून २१९ किमी (१७३ मैल) दक्षिणेस समुद्राखाली होते. भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक लोकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. सध्या कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT