Dadar GOOGLE
Video

Mahaparinirvan Din : ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, बाबासाहेबांना केलं अभिवादन |VIDEO

Dr. Babasaheb Ambedkar : आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. या प्रसंगी 'बुद्धं सरणं गच्छामि' असा घोष करण्यात आला.

महापालिकेच्या माध्यमातून शिवाजी पार्क मैदानात अनुयायांच्या राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे सोबतच अंघोळ आणि शौचालयाची देखील सोय करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांकडून देखील गर्दीवर चांगल्या पद्धतीचे नियंत्रण करण्याचे काम या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच काही भीम अनुयायी स्वयंसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छतेचे काम देखील चोक पणे पार पडल्याचे दिसून येत आहे.

तसेच महापालिकेच्या माध्यमातून विविध स्टॉलच्या जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी की-चैन पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत अनेक वस्तूंची विक्रीचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या स्टॉल वरती खास करून पुस्तक विक्री सर्वाधिक होत असताना दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकत्र, कारण काय? VIDEO व्हायरल

Chai Masala: रोजचा चहा अजून फक्क्ड होणार, 'हा' घरगुती मसाला टाकून पाहा

Maharashtra Live News Update: भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने महाआरती

Alphonso Mango: हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, कोकणातील शेतकरी कोर्टात जाण्याच्या तयारीत

पुण्यात मोठा राजकीय भूकंप! भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT