नांदेड क्राईम न्यूज संतोष जोशी
Tajya Batmya

नांदेडमधील खळबळजनक घटना: सासुची हत्या करुन जावयाची आत्महत्या

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार तरोडा (खु) परिसरारत असलेल्या भावसार नगरातील रहिवासी मालिनी विजयकुमार बाहेकर यांची मुलगी मोहिनी हिचा आंतरजातीय विवाह सहा वर्षांपूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाडसोबत पार पडला.

संतोष जोशी

नांदेड : पत्नीला सासरी पाठवीत नसल्याच्या कारणावरुन रागाच्या भरात जावयाने सासूच्या डोक्यात जात्याची पाळू घालून निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने दुसऱ्या खोलीत जावून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. चार) भावसारनगर परिसरात घडली. मात्र सोमवारी (ता. पाच) रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्हीही घटनांची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार तरोडा (खु) परिसरारत असलेल्या भावसार नगरातील रहिवासी मालिनी विजयकुमार बाहेकर यांची मुलगी मोहिनी हिचा आंतरजातीय विवाह सहा वर्षांपूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाडसोबत पार पडला. मोहिनी लातूर येथील एका खासगी बँकेत नोकरीला असून श्रीकांत लातूरच्या एका हाॅस्टेलवर वार्डन म्हणून काम करीत होता.

हेही वाचा - जगाला स्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा मान मेरी कोम-मनप्रीतला

परंतु लाॅकडाऊनमध्ये श्रीकांतची नोकरी गेल्याने त्याला दारुचे व्यसन लागले. त्यामुळे पती- पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने मोहिनी ही माहेरी निघून आली. त्यानंतर श्रीकांत पत्नीला घेऊन जाण्याचा प्रयत्‍न करत होता. परंतु सासू पाठविण्यास तयार नव्हती. दरम्यान मालिनी बाहेकर ( वय ५६ ) या चार जुलै रोजी रात्री घरी एकट्याच असताना श्रीकांतने नऊ ते अकरा वाजताच्या सुमारास जात्याची पाळू सासूच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. सासू रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर श्रीकांत याने दुसर्‍या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या दिवशी त्याची पत्नी बाहेरच्या नातेवाईकाकडे होती. म्हणून तिचा जीव वाचला असे पोलिसांनी सांगितले.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रशेन देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी जयवंत पाडदेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

Smart Phone Hack : हॅकर्सचा नवा डाव! हजारो किलोमीटर अंतरावरून तुमचा स्मार्टफोन स्क्रीन रेकॉर्ड करणार

Kumbha Rashi : मंगळवारी अचानक धनलाभाची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राशिभविष्य

Ganpati Fugdi Dance: 'बस फुगडी, पाय लंगडी'; ७५ वर्षीय आजींची रंगली जुगलबंदी VIDEO

Ashok Mama : मंगलमूर्ती मोरया! अशोक मामांनी साकारली गणपतीची सुरेख मूर्ती, VIDEO पाहून डोळ्याचं पारणं फिटेल

SCROLL FOR NEXT