सुगरण

भाजपच्या किती प्रभावाखाली राहायचं हे शिवसेनेनं ठरवावं  : बाळासाहेब थोरात

सकाळ न्यूज नेटवर्क

संगमनेर : आता शिवसेनेने ठरवायचे आहे की, त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, कॉग्रेसकडे प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ, असे महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष  वेगळ्या फाॅमुर्ल्यास तयार झाल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे थोरातांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झाली आहेत. सत्ता स्थापन करण्याची काहीही घाई नाही, योग्य वेळी निर्णय घेण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी वेगळीच आघाडी निर्माण होण्याबाबतही सध्या चर्चा हाेत आहे. याबाबत संगमनेरमध्ये आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ, मात्र त्याआधी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. भाजपाला घाबरायचे अथवा नाही हे आता सर्वस्वी शिवसेनेने ठरवावे. शिवसेनेचा निर्णय झाल्यास आम्ही आमच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची परवानगी घेऊ अशीही भूमिका थोरात यांनी मांडली.

दरम्यान, अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना आपल्यावर तीन महिन्यांपूर्वी राज्याची जबाबदारी काँग्रेसने टाकली, आपण ती पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न केला. संगमनेर मतदारसंघाला वेळ देता आला नाही. मात्र आपली निवडणूक कार्यकर्ते आणि जनतेनेच लढवली. त्यामुळे हा संगमनेरच्या जनतेचा विजय असल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: balasaheb thorat hint to support shiv sena maharashtra election result 2019

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

Ladki Bahin Yojana: "काहींना लाडकीचा लाभ नाही" , राम कदमांच्या वक्तव्यानं राजकारणात चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update :नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT